पुणे – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अफलातून झेल घेतला. इंग्लंडचा आदिल रशिद याचा कव्हरमध्ये कोहलीने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सूर मारत एकहाती झेल घेतला.
कोहलीने घेतलेला हा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, कोहली नव्हे सुपरमॅन अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कोहलीचे कौतुक केले आहे.
आदिल रशिद व सॅम कुरेन यांनी भारतीय संघाला तुल्यबळ लढत दिली. यावेळी भारताच्या हातातून सामना निसटणार का, याची चिंता निर्माण झाली होती. कोहलीने 40 व्या षटकात शार्दुलकडे चेंडू सोपवला. शार्दुलनेही कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत आदिल रशिदला बाद केले.
विराटने रशिदचा ऑफ साईडला कव्हरमध्ये अफलातून झेल घेतला. जागतिक क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडू कोहलीच आहे हेदेखील त्याने घेतलेल्या झेलाने स्पष्ट झाले.