कन्यारत्न…विराट झाला बाबा!

विराट आणि अनुष्काला कन्यारत्नाचा लाभ

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय.  विराट आणि अनुष्काला कन्यारत्नाचा लाभ झालाय. कोहलीसाठी ही त्याच्या आयुष्यातील सर्वात ‘गोड’ बातमी ठरली आहे. याबाबतची माहिती विराट कोहली याने सोशल मीडियाव्दारे दिली आहे. ( Virat Kohli announces the arrival of a baby girl )

विराट कोहली याने ट्विट करत म्हटले आहे की, “आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे.”

दरम्यान, कोहलीने हे ट्विट करताच विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील ट्विट करत विराटचे अभिनंदन करताना शुभेच्छा दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.