नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने लोकप्रियतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले. मोदीच नव्हे तर विविध राजकीय नेते, सेलीब्रिटी यांना देखील पिछाडीवर टाकत कोहलीची फाॅलोअर्सची संख्या ५ कोटी झाली आहे.
इस्टाग्रामवर विविध व्यक्तीची लोकप्रियता मोजली जाते. त्यात कोहलीचे ५ कोटी चाहते झाले आहेत. ही संख्या संपूर्ण देशात अद्याप कोणालाही नोंदविता आलेली नाही. इस्टाग्राममध्ये मोदींचे ३ कोटी ४५ लाख फाॅलोअर्स आहेत. कोहलीने इस्टाग्रामवर जवळपास एक हजार पोस्ट केल्या आहेत. तसेच तो स्वत: दीडशे जणांना फाॅलो करतो.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे १ कोटी ७५ लाख फाॅलोअर्स आहेत. तर, फुटबाॅल स्टार अर्जेंटिनाचा फुटबाॅलपटू लियोनेल मेस्सीचे १४ कोटी इतके फाॅलोअर्स आहेत.