#CWC19 : विराट कोहली वीस हजार धावांचा मनसबदार

मँचेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 268 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांत गुंडाळून 125 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकिर्दीत 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 417 डावांमध्ये ही कामगिरी केली व सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला. तेंडुलकर व लारा यांनी 453 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. भारताकडून 20 हजार धावा करणारा कोहली हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी सचिन (34,357 धावा) व राहुल द्रवीड (24,208 धावा) यांनी हा मान मिळविला आहे.

दृष्टिक्षेपात कामगिरी

6, 613 धावा
77 कसोटी, 25 शतके,
20 अर्धशतके

11, 159 धावा
232 एकदिवसीय, 41 शतके
53 अर्धशतके

2,263 धावा
67 टी-20,
20 अर्धशतके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here