वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने एका वर्षात तब्बल २२९ कोटी रुपये कमाई केली आहे. फोर्ब्स कडून १०० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. सलग पाचव्यांदा सर्वाधिक कमाई करणारा विराट ठरला आहे. फोर्ब्सच्या या यादीमध्ये विराट ५९ व्या स्थानावर आहे. याआधी ६६ व्या स्थानावर तो होता.
वर्षभरात केलेल्या २२९ कोटी कमाई पैकी विराटने आयपीएल मधून २५ कोटी वेतन म्हणून मिळाले आहेत, तर बाकी २०४ कोटींची कमाई त्याने जाहिरातीतून मिळवीली आहे. याआधी २०१९ मध्ये विराट १८९ कोटीच्या कमाईसह या यादीत १०० व्या नंबरवर होता.
फोर्ब्सच्या या यादीत मिक्स्ड मार्शल आर्ट खेळाडू कॉर्नर मेकग्रेगर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची वर्षभराची कमाई १५१७ कोटी आहे. खालोखाल फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी यांचा नंबर असून त्याची कमाई ९१९ कोटी तर फुटबॉलपटू रोनाल्डोची कमाई ८७५ कोटी असून तो तीन नंबरवर आहे. या यादीत दोन महिला असून दोघी टेनिस खेळाडू आहेत. जपानची नियोमी ओसावा ४०२ कोटींच्या कमाई सह महिला वर्गात पहिल्या तर एकूण यादीत १५ व्या क्रमाकांवर आहे तर सेरेना विलियम्स २५९ कोटीच्या कमाईसह ४४ व्या नम्बरवर आहे. टेनिस स्टार रोजर फेडरर गतवर्षी अव्वल स्थानी होता मात्र यावर्षी तो सातव्या क्रमांकावर गेला असून त्याची कमाई आहे ६१२ कोटी.