मँचेस्टर – विराट कोहलीने पाकविरुद्धच्या सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा पल्ला गाठण्यासाठी विराटला 57 धावांची गरज होती. या सामन्यात विराटने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या सामन्यात विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सर्वात कमी डावांमध्ये 11 हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर जमा झाला आहे. विराटने 222 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सचिनला ही कामगिरी करण्यासाठी अधिक डाव लागले होते.
11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
MILESTONE ALERT 🚨#TeamIndia Skipper #ViratKohli breaches the 11k run mark in ODIs 💪💪🇮🇳 pic.twitter.com/TMzuZjL5FW
— BCCI (@BCCI) June 16, 2019
दरम्यान, विराटने रविवारी पाकिस्तानविरूध्दात झालेल्या सामन्यात 65 चेंडूत 77 धावा केल्या.