स्मृती मंधाना हिने भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये सलामीवीर म्हणून बऱ्यापैकी नाव कमावले आहे. तिच्या डावखुऱ्या फलंदाजीची तुलना ही भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याशी केली जाते. दरम्यान, फलंदाजीसोबतच स्मृती मंधाना ही तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram
स्मृती 9 वर्षांची असताना तिला महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली तर 11 व्या वर्षी 19 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. ऑक्टोबर 2013 मध्ये 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघातर्फे खेळताना तिने गुजरातविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 150 चेंडूत नाबाद 224 धावा काढल्या आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली!
View this post on Instagram
स्मृतीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तसेच सोशल मीडियावरून तिला नेहमीच वैयक्तिक प्रश्न विचारले जात असतात. दरम्यान, सध्या स्मृतीचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या विवाहाबाबत विचारण्याच आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
स्मृती मंधानाला विराट नवीन नावाच्या युझरने विचारले होते की, ती लव्ह मॅरेज करणार आहे की अरेंज मॅरेज? त्यावर स्मृती मंधानाने धमाल उत्तर दिले आहे. स्मृती मंधाना या युझरला उत्तर देताना म्हणाली की ती लव्ह-रेंजड मॅरेज करेल. याचा अर्थ मंधाना आधी प्रेम करेल. मग दोन्ही कुटुंबांची समजून घालून अरेंज मॅरेज करेल.
View this post on Instagram
2016 मध्ये इंडीया रेड संघाला वुमेन्स चॅलेंजर ट्रॉफी मिळवून देण्यात तिचा महत्वाचा वाटा होता. यावेळी तिने तीन अर्धशतके फटकावली. तिच्या उत्कृष्ट फलांदाजीच्या जोरावर 2016 मध्ये तिला आयसीसी महिला संघात स्थान मिळाले,असे स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला होती. यानंतर ती वुमेन्स बिग बॅश लीग व कीया सुपर लीग कडून देखील खेळली.