मुंबई – देशभरात फेक न्यूज म्हणजे खोट्या बातम्या ही सर्वांसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. सध्याच्या सोशलवर कधी राजकीय नेत्यांबाबत तर कधी बॉलीवूड कलाकारांबाबत फेक न्यूजचा प्रसार आणि प्रचार केल्याचे दिसून येते. याच फेक न्यूज च्या झपाट्यात बॉलीवूड अभिनेते अजय देवगण सापडले आहे.
Some ‘doppelgänger’ of mine seems to have got into trouble.
I’ve been getting concerned calls. Just clarifying, I’ve not traveled anywhere. All reports regarding me being in any brawl are baseless. Happy Holi— Ajay Devgn (@ajaydevgn) March 29, 2021
साध्य सोशलवर एक फाके व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये चोप दोन गटांत झालेल्या भांडणाचा व्हिडीओत ज्या व्यक्तिला देण्यात अली हा व्यक्ती अजय देवगण असल्याचा दावा सोशल मीडियावरील युजर्स करून केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओत अजय देवगणचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. आता हा व्हिडीओ पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजयच्या टीमने तसा खुलासा केला आहे. अजयनेही ट्वीट करून तो मी नव्हेच, असे स्पष्ट केले आहे.
त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे कि,’कदाचित माझा कोणी कार्बन कॉपी अडचणीत सापडला आहे. मला याबाबत सतत कॉल येत आहेत. मी दिल्लीला गेलोच नव्हता. माझा कोणाशी वाद झाल्याची बातमी खोटी आहे, असे अजयने ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.’
सध्या या व्हिडियोची चर्चा सोशलवर जोरात सुरु असून या प्रकरणामुळे अजयला ट्रोल देखील करण्यात आले होते.