#Viralpost :अक्षयने पत्नी ट्विंकल खन्नासाठी आणले कांद्याचे झुमके

मुंबई – बॉलिवुडमधील सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्‌विंकल खन्ना सध्या आपल्या ब्लॉग्स आणि पुस्तकांमुळे सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. ट्‌विंकल खन्ना सद्य परिस्थिती, राजकिय आणि सामाजिक घडामोडीवर टिपण्णी करत आलोचना करत असते.

यातच काही दिवसांपूर्वी ट्‌विंकलने नुकताच असा एक ब्लॉग सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ब्लॉग काद्यांचे वाढलेले दर बाबत होता. एकीकडे तिच्या ब्लॉगमुळे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असतांना पुन्हा एकदा कांद्यामुळे ती चर्चेत आली आहे.


तर आता खिलाडी अक्षय कुमारने सोनी वाहिनीवरील कपिल शर्मा शो मध्ये आपल्या आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ च्या प्रमोशन साठी गेला असता त्याने एक खास गोष्ट आपल्या पत्नी ट्विंकल खन्नासाठी आणली. ही वस्तू मुळात या चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूर हिला या शो च्या टीमकडून देण्यात आली होती. मात्र तिला ती जास्त न आवडल्याने अक्षय ती गोष्ट आपल्या पत्नीसाठी घेऊन गेला.


ही वस्तू म्हणजे कांद्याचे झुमके आहेत. जेव्हा ट्विंकल खन्ना हे पाहिले तेव्हा तिला हसावे की रुसावे हे काही कळत नव्हतं. मात्र नव-याच्या या अनोख्या अंदाजाचे तिने इन्स्टाग्राम वरुन कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.