नवी दिल्ली- दुबईच दोन महिला गायिकांनी काही दिवसांपुर्वी सुफि क्लासिकल गाणं गातानाचा व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला होता. तोच व्हिडियो पून्हा प्रकाशझोतात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीयो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Sufiana kalaam …
‘Dam a Dam Mast Qalander’ goes international pic.twitter.com/QesynuB4mq— KJS DHILLON (@Tiny_Dhillon) October 11, 2020
दुबईच्या रस्त्यांवरचा हा व्हिडियो आहे. यात त्या दोघी दमा दम मस्त कलंदर गाणं गात आहेत. त्यांंच्या या गाण्याचं अनेत स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. 2017 मध्ये लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लो यांनी ट्विटरवर पोस्ट केलं होतं. त्या दोघी आणि त्यांचा गिटार वाजवणारा सहकारी या तिघांनी मिळून सध्या सोशल मीडिया काबिज केलं आहे.
दरम्यान, या आधीही अशा अनेक गाण्यावर नेटकरी फिदा झाले होते. सध्या सोशल मीडियामुळे कोणाला प्रसिद्धी मिळते तर कोणाची भूक भागते आहे. काही दिवसांपुर्वी बाबा का ढाबा याचे मालक असणाऱ्या आजोबांचा रडणारा व्हीडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या या ढाब्यावर खवय्य्यांची रांग लागली, त्यामुळे सोशल मीडियामुळे कोण हिरो तर कोण झिरो होईल याचा काही अंदाज नाही.