नगर – तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने मटका बुकीकडे पैसे मागतानाची व्हिडिओ “क्लिप सोशल मीडियावर व्हायरल’ झाली आहे. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.
मंगळवार (दि.16) तोफखाना पोलीस ठाण्यातील आणखी एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओ क्लिप’ मध्ये एक पोलीस कर्मचारी मटका बुकीकडे पैशाची मागणी करीत असल्याचे दिसत आहे. तसेच शहरातील काही बड्या मटका बुकींची नावेही त्यात क्लिपच्या संभाषणात आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.