नामकरण या सीरियलमधील ऍक्टर विराफ पटेल याने लॉकडाऊनच्या काळातच लग्न उरकले आहे. बांद्रा कोर्टात जाऊन त्याने गर्लफ्रेंड सलोनी खन्नाबरोबर परिसर नोंदणी विवाह केला. करोनाची दुसरी लाट तीव्र झाली असताना त्याने थाटामाटात समारंभ करून लग्न करणे टाळले आणि साध्या पद्धतीने नोंदणी विवाह करण्याचा पर्याय निवडला. यामुळे वाचलेला पैसा करोनाच्या मदत कार्यासाठी दान करता येईल, असा त्याचा प्रयत्न आहे.
View this post on Instagram
लग्नानंतर विराफ आणि सलोनी यांनी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि त्यांना खूप लाईक मिळत आहेत. लग्नातला खर्च वाचवण्यासाठी विराफने सलोनीला महागडी अंगठी घालण्याऐवजी चक्क रबर बंड चढवले. या लग्नाला कोण कोण आणि कितीजण उपस्थित होते, हे समजू शकलेले नाही.
View this post on Instagram
सध्याच्या कठीण प्रसंगात एकमेकांची साथ आवश्यक असल्याने लवकरात लवकर लग्न करणे आवश्यक होते म्हणूनच शॉर्टकट कोर्ट मॅरेज केल्याचे त्याने सांगितले. पण वाचवलेला खर्च करोनाच्या मदत कार्यासाठी कसा दिला जाणार आहे, हे मात्र त्याने सांगितलेले नाही.