कृष्णवर्णीयाच्या हत्येनंतर ब्राझीलमध्ये हिंसाचाराचा ‘भडका’

ब्रासिलिया (ब्राझील) – ब्राझीलमध्ये केअरफोर या सुपर मार्केटच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीत एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या सुपर मार्केटवर हजारो नागरिकांनी हल्ला चढवला. या हत्येनंतर ब्राझीलमध्ये देशभर आंदोलने सुरू झाली आहेत.

एका महिला कर्मचाऱ्याला या युवकाने हल्ला करण्याची धमकी दिली त्यावेळी तिने सुरक्षा रक्षकांना पाचारण केल्याचे पोलिसांनी सांगितले. समाज माध्यमांत सुरक्षारक्षक या कृष्णवर्णीयाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे. मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू श्‍वास कोंडल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे.

या क्रुर हत्येबद्दल आम्ही खेद व्यक्त करत असून दोषींना शिक्षा होण्यासाठी आपण योग्य त्या कायदेशीर मार्गांचा तातडीने अवलंब करत आहोत, असे पत्रक फ्रान्सच्या केअरफोर या बहुराष्ट्रीय कंपनीने तातडीने प्रसिध्दीस दिले आहे.

आम्ही सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. त्याचबरोबर ही घटना घडली त्याचवेळी त्यांना स्टोअरप्रमुखाने कर्मचाऱ्यांना समज दिली आहे. आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही हे स्टोअर बंद करत आहोत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

पोर्टो अलेग्र येथील निदर्शकांनी केअरफॉरच्या लोगोवर रक्ताचे डाग दाखवलेले स्टिकर वाटप केले. त्यांनी केअरफोरच्या साखळीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. यात मरण पावलेल्याच्या टोपणनावावरून “जस्टीस फॉर बेटो’ असे लिहलेले फलक झळकावत निदर्शने सुरू केली. त्यानंतर त्याला सायंकाळी हिंसक वळण लागले. या सपर मार्केटच्या खिडक्‍या त्यांनी फोडल्या. त्यांची पुरवठा करणारी वाहने पेटवून दिली. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून निदर्शकांना पांगवले.

सॅओ पावलो येथे केअरफोरवर शेकडो निदर्शकांनी जोरदार दगडफेक केली दार तोडून आतील सामानाची अक्षरश: विल्हेवाट लावली. रिओ द जानेरिओमध्ये अन्य एका केअरफोरच्या दुकानापुढे सुमारे दोनशे जणांनी संतप्त निदर्शने केली.

विद्वेष आणि वांशिकवाद यांची संस्कृतीचा मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी वांशिक आणि विद्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायद्याने आपली पूर्ण ताकद पणाला लावली पाहिजे, असे ट्‌विट ब्राझिलच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष रोड्रीगो माइआ यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.