शिक्रापूर -वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे महिलांमध्ये किरकोळ कारणातून वाद होऊन वादाचे रुपांतर भांडणात झाले, दरम्यान भांडणात चाकू व कोयत्याचा वापर केल्याने पाच जणांवर शिक्रापूर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत रेखा रमेश भंडारे व नम्रता विकास पोतले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. शिक्रापूर पोलिसांनी नम्रता विकास पोतले, मंगल पोतले, विजय पोतले,
नम्रता पोतले यांचे वडील (सर्व रा. मोहितेवाडी ता. खेड) तसेच रेखा रमेश भंडारे (रा. वाडा गावठाण कोरेगाव भीमा ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
वाडा पुनर्वसन येथे रेखा भंडारे यांच्या घरी नम्रता पोतले व त्यांच्या घरातील काही व्यक्ती आले असता रेखा व नम्रता यांच्यामध्ये किरकोळ कारणातून वादावादी होत वादाचे रुपांतर भांडणात झाले.
यावेळी विजय पोतले यांनी रेखा यांना मारण्यासाठी कोयता भिरकावला असता तो कोयता रेखा यांच्या तोंडाला लागला. त्यावेळी रेखा यांनी नम्रता यांना चाकू मारला असता तो चाकू नम्रता यांच्या हाताला लागला. तपास पोलीस नाईक संतोष मारकड करीत आहेत.