कोलकाता – कोलकात्यामध्ये अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यातील प्रचार सभांची मुदत गुरुवारी रात्री दहा वाजता संपणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रचार थंडावला असला तरी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डमडम इथं मोदींच्या रॅलीहून परतणाऱ्या भाजप नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन गाड्यांचं नुकसान झालं. टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. भाजप नेते समिक भट्टाचार्य, आणि मुकुल रॉय यांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहे.
West Bengal: Vehicles of BJP Lok Sabha candidate from Dum Dum, Samik Bhattacharya & party leader Mukul Roy were attacked by unidentified people in Nagerbazar area of the constituency earlier tonight. Bhattacharya & Roy were not present in the vehicles at the time of the incident. pic.twitter.com/v3DpZt9ls6
— ANI (@ANI) May 16, 2019