Manipur – मणिपूरच्या इंफाळ पूर्व जिल्ह्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. लमलेन पोलीस स्टेशन हद्दीतील टेकचम येथे ही घटना घडली. आरके पृथ्वी सिंग असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती, त्याचे हात पाठीमागे बांधलेले होते आणि एका पॉइंट-ब्लँक रेंजमधून गोळी घालून त्याला मारण्यात आले. केसीपी (प्रोग्रेसिव्ह) या प्रतिबंधित संघटनेने, सिंग सुरक्षा दलांसाठी हेरगिरी करत असल्याचे कारण देत त्याची हत्या केली.
या संघटनेने असा दावा करण्यात आला आहे की सिंग हा माजी अतिरेकी होता त्याने सैन्यासाठी हेरगिरी करण्यासाठी इतर आत्मसमर्पण केलेल्या अतिरेक्यांसोबत हातमिळवणी केली होती.
दरम्यान, प्रतिबंधित केसीपी (तैबंगनबा) संघटनेच्या एका अतिरेक्याला कक्चिंग जिल्ह्यातील तेजपूर माखा लेकई येथून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.