अर्थसंकल्पामधील घोषणा शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी – विनोद तावडे

मुंबई – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी विधीमंडळात सादर केला गेला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.

आजच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या घोषणा या आशादायी आहेत अस म्हणतं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

विनोद तावडे यांनी म्हटले आहे की, “ज्या प्राथमिक, माध्यमिक शाळांना यापूर्वी अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला आहे त्यांना आज अर्थसंकल्पात अनुदानाचा पुढील टप्पा घोषीत करण्यात आला आहे. अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा घोषित केला गेला आहे. तसेच शाळांमधील नैसर्गिक अनुदानित वाढीच्या तुकड्यांना अनुदान देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पामधील या घोषणा शिक्षण क्षेत्रासाठी आशादायी आहेत”.

अर्थसंकल्पातील इतर शैक्षणिक तरतुदी –

-वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय महाविदयालयांची बांधकामे व इतर उपक्रमांसाठी रूपये ७६४ कोटींची तरतूद

-‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्याकरीता उत्पन्नाची मर्यादा आता रू. ८ लक्ष असेल

Leave A Reply

Your email address will not be published.