#AsianWrestlingChampionships : विनेश फोगाटला कांस्यपदक

नवी दिल्ली : जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणा-या विनेश फोगाट हिला ( ५३ किलो वजनी) आशियाई कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.

दिल्ली येथील खाशाबा जाधव बंदीस्त कुस्ती संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत विनेश हिने व्हिएतनामच्या थी जी कियू हिचा १०-० ने पराभव करत विजय नोंदविला.

दरम्यान, याधीच्या लढतीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणा-या जपानच्या मायो मुकेदा हिने विनेश फोगाट हिचा ६-२ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.