Vinesh Phogat | भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांनी गुरुवारी (8 ऑगस्ट) सकाळी ५ वाजता कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारमुळे विनेश खूप दु:ख झाल्याचे त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगट खूपच नाराज झाल्या होत्या. वजन जास्त असल्याने त्यांना बुधवारी (7 ऑगस्ट) अंतिम सामन्यातून ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त केला असून आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे.
अशात मथुरेतील भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही खंत व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या प्रतिक्रिया देतांनाच्या व्हिडिओ वरून त्या चांगल्याच ट्रोल होत आहे.
VIDEO | “It is very surprising, and it feels strange that she was disqualified for being 100 gm overweight. It is important to keep the weight in check. It is a lesson for all of us. I wish she should lose that 100 gm quickly but she would not get an opportunity,” says BJP leader… pic.twitter.com/9vFyl91Dll
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2024
मथुरेच्या खासदार हेमा मालिनी म्हणाल्या,’विनेश फोगटला 100 ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र ठरवण्यात आले. यावरून लक्षात येते की तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे किती महत्त्वाचे आहे. 100 ग्रॅम वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले हे खूप विचित्र वाटते. वजनामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्याने, निरोगी वजन राखणे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे शिकायला हवे. विशेषत: आपल्या सर्व कलाकारांनी आणि स्त्रियांनी हे लक्षात घेतले पाहिजे की 100 ग्रॅम जास्त वजन किती महत्त्वाचे आहे.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की,’विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. तिने त्वरित 100 ग्रॅम वजन कमी करावे अशी माझी इच्छा आहे. मात्र आता संधी मिळणार नाही.’ त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता युजर्स संतापले आहे. हेमा मालिनी यांनी हसत प्रतिक्रिया दिल्याचे काही युजर्सची म्हणणे आहे. यावरून त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.