Vinesh Phogat Disqualified Olympics: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती 50 किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, डिहायड्रेशनमुळे विनेश फोगटची प्रकृती खालावली असून तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाही तर स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता तिची तब्येत स्थिर असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आलिशान कार आणि हरियाणामध्ये शानदार विला :
विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदकं जिंकणारी विनेश फोगाट एकमेव महिला रेसलर आहे. 29 वर्षाच्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती 36.5 कोटी रुपये आहे. मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्सकडून विनेशला 50,000 रुपये वेतन मिळतं.
तिची वर्षाची सॅलरी 6 लाख रुपये होते. त्याशिवाय विनेश फोगाट बेसलाइन वेंचुर्स आणि कॉर्नरस्टोन स्पोर्टची ब्रँड एम्बेसिडर सुद्धा आहे.
विनेश फोगाटचा हरियाणामध्ये एका शानदार विला आहे. त्याशिवाय तिच्याकडे अजूनही संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. कुस्तीशिवाय ब्रँड एंडोर्समेंट्स आणि मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्सकडूनही तिला सॅलरी मिळते.
विनेश फोगाटकडे एकापेक्षाएक भारी कार्स आहेत. तिच्याकडे तीन लक्जरी कार आहेत. यात एक टोयोटा फॉर्चूनर आहे. त्याची किंमत 35 लाख रुपये आहे. टोयोटा इनोवा कार सुद्धा आहे. त्याची किंमत 28 लाख रुपये आहे. त्याशिवाय मर्सिडीज GLE सुद्धा आहे.
7 वर्षांच्या अफेअरनंतर केलं लग्न :
विनेश फोगटने 13 डिसेंबर 2018 रोजी कुस्तीपटू सोमवीर राठीशी विवाह केला, जो राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकला होता. विनेश आणि सोमवीर 2011 पासून एकमेकांना ओळखत होते जेव्हा दोघे भारतीय रेल्वेत एकत्र काम करत होते. येथे दोघेही पहिल्यांदा भेटले आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. 7 वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केले.
अन् विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं :
विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता. सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले.