Vinesh Phogat Disqualified Olympics: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. सर्व स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे.
अश्यात विनेश फोगाट हिचे सासरे राजपाल राठी यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “याप्रकरणात कट रचल्याचा आरोप नाकारू शकत नाही. केवळ १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अयोग्य ठरवण्यात आले. केसांचं वजन ३०० ग्रॅम असते. जर इतकीच अडचण होती, तर हे केस कापता आले असते.’ अशी प्रतिक्रिया राठी यांनी दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
विनेश फोगाट हिचे लग्न सोमवीर राठी याच्याशी झालेले आहे. विनेश अंतिम फेरीसाठी धडक मारली. त्यापूर्वी तिने काल जपानच्या युई सुसाकी, युक्रेनच्या ओकसाना लिवाच आणि गुजमॅ लोपेजचा पराभव केला.मात्र आज फायनल पूर्वीच विनेश फोगट हिला अपात्र घोषित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया –
“विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
पण मला माहित आहे की आव्हानांना सामोरे जाणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही मजबूतीने कमबॅक करताल, आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे देखील एकदा वाचा….