नवी दिल्ली – भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट तिच्या कारकिर्दीच्या वाईट काळातून जात आहे. भारतीय कुस्ती महासंघाने तिला निलंबित केले आहे, यादरम्यान भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना तिने कायदाच्या चौकटीतून उत्तर दिले आहे.
‘ऑलिम्पिक संपते नाही तोवरच नोटीस आली, त्यामुळे मी अस्वस्थ झाली आहे. भरीव कामगिरी करता आली नाही, याची सल आहेच, मला पश्चाताप होतोय. मात्र, महासंघाने लावलेल्या आरोपांचे मी आदरपूर्वक खंडन करते.” असे विनेशच्या वकिलांकडून महासंघाला देण्यात आलेल्या उत्तरात विनेशने आपले मत मांडले.
याशिवाय विनेश पुढील कोणत्या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबात अद्याप अनिश्चितता आहे. ‘मी महासंघाने कुस्तीपटू विनेशवर लावलेल्या आरोपांना फक्त उत्तर दिले आहे. आता कुस्ती महासंघ यावर काय प्रतिक्रिया देतात त्याची आम्ही वाट पाहतोय”, असं क्रीडा लीगलचे व्यवस्थापकीय भागीदार विदुषपत सिंघानिया म्हणाले.
भारतीय कुस्ती महासंघाकडून लावण्यात आलेले आरोप
– ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तणूक आणि अनुशासनहिनतेचा आरोप
– भारतीय ऑलिम्पिक जर्सी न घालणं
– भारतीय कुस्ती दलातील इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याचा आरोप
विनेश फोगटची प्रतिक्रिया
- स्पर्धेमध्ये मी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने जी जर्सी दिली होती ती लढती दरम्यान परिधान केली नाही, त्या ऐवजी दुसरी जर्सी वापरली, त्यावर महासंघाने जो आरोप लावला आहे, तो मी मान्य करते आणि महासंघाची माफी मागते.
मी ती जर्सी ट्रेनिंगसाठी घातली होती आणि मॅचच्या दिवशी ती धुतलेली नव्हती म्हणून घातली नाही. मी ही चूक जाणून केली नव्हती, असे तिने सांगितले.
भारतीय कुस्ती दलातील इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याचा आरोप खोटा असल्याचं म्हणत विनेशने फेटाळून लावला. तिने उत्तरात म्हटलंय की, “प्रोटोकॉलमुळे मी २९ जुलैच्या दुपारच्या प्रशिक्षणासाठी इतर भारतीय पैलवानांप्रमाणेच दिलेल्या वाहनानेच गेले होते.
परंतु संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या मॅटवर प्रशिक्षण दिले गेले. मी ४ आणि ५ ऑगस्ट रोजी सीमा बिसलासोबत प्रशिक्षण घेतले आहे.
मी माझ्या वैयक्तिक प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतले, तसेच मुख्य प्रशिक्षकांच्या संपर्कात होते आणि त्यांना माझ्या सराव शिबीराची माहिती दिली.
नंतर ३ आणि ४ तारखेला माझी भारतीय कुस्तीपटू सीमा बिसलासोबत सराव झाला. त्यामुळे मी भारतीय प्रशिक्षकांकडून सराव घेतला नाही, हा आरोप चुकीचा आहे,” असे तिने आपल्या उत्तरमध्ये म्हंटल आहे. यापुढे विनेश म्हंटल आहे की . मी हंगेरीहून २८ जुलै रोजी टोकियोत दाखल झाले.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान सरकारने खेळाडूंच्या प्लेबुकमध्ये नमूद केलेल्या करोनाच्या गाईडलाईन्स आणि विलगीकरणाच्या नियमांचे पालन करत होते. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पोहोचल्यानंतर भारतातील प्रत्येक खेळाडूला ३ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करणे अनिवार्य होते.
परंतु भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) परदेशात प्रशिक्षण घेऊन टोक्योत पोहोचणाऱ्यांना विलगीकरण बंधनकारक नसल्याचं सांगितले होते.
“मी नेहमीच कुस्ती महासंघाचा आणि सदस्यांच्या भूमिकेचा सन्मान केलाय. मी नेहमीच एक संघाचा भाग या राहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही माझी वर्तणूक त्याप्रमाणेच राहिली आहे.”असं विनेश म्हणाली.