शिवसेनेच्या लोकसभेतील नेतेपदी विनायक राऊत

मुंबई-शिवसेनेच्या लोकसभेतील नेतेपदी शनिवारी खासदार विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या नियुक्तीला महत्व आहे. 65 वर्षीय राऊत दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

ते कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राऊत 1999 ते 2004 या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यावेळी ते मुंबईतील विले पार्ले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर त्यांना 2012 मध्ये विधान परिषदेवर जाण्याची संधी देण्यात आली.

लोकसभेतील नेतेपदी नियुक्ती झाल्याने राऊत यांचे शिवसेनेतील वजन वाढल्याचे मानले जात आहे. शिवसेना हा भाजपनंतर केंद्रातील सत्तारूढ आघाडीमधील (एनडीए) दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.