मुंबई – “खलनायक 2′ ची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात या सिनेमाच्या स्क्रिप्टवर बरेच काम झाले आहे. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई आणि मूळ ‘खलनायक’चा नायक संजय दत्त या दोघांनाही मूळ सिनेमाचा दुसरा भाग बनवायची इच्छा होती.
View this post on Instagram
त्यानुसार स्क्रिप्ट केली गेली आणि त्यामध्ये दोघांनीही आपापल्या सूचना दिल्या. गमतीची गोष्ट ही की दोन्ही उचवलेल्या सिनेमांमध्ये खूप फरक आहे पण ‘खलनायक-2’ मध्ये टायगर श्रॉफ हिरो असावा यावर सुभाष घई आणि संजय दत्त यांचे एकमत झाले आहे. टायगर श्रॉफसाठी खलनायक बनण्याची ही पहिलीच वेळ असेल. जॅकी श्रॉफला मात्र आपला मुलगा खलनायक बनवावा असे वाटत नव्हते.
View this post on Instagram
मात्र सुभाष घई त्याच्याशी बोलले आणि हिरोचा रोल समजावून सांगितला. मग जॅकी तयार झाला. ‘खलनायक-2’ मध्ये मूळ ‘खलनायक’मधील संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे देखील असतील. टायगरचे पूर्वीचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत.
View this post on Instagram
त्यामुळे त्याला ‘खलनायक-2’ कडून जरा जास्तच अपेक्षा असणार आहेत. अर्थात या सिनेमात मूळ ‘खलनायक’ प्रमाणे “चोली के पीछे क्या हे’ यासारखे गाणे असेल की नाही हे अद्याप समजलेले नाही.
View this post on Instagram