मंचर, (प्रतिनिधी) – रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे. शासनाचा जरी निधी असेल तरी गावाची व ग्रामस्थांची जबाबदारी मोठी आहे.त्यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहिले पाहिजे, असे मत भाजप किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय थोरात यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव चांडोली खुर्द-काटेमळा रस्त्यावरील मुक्ताई मंदिर ते ब्राह्मणमळा रस्त्याचे रस्त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भाजप किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय थोरात यांच्या प्रयत्नाने 25 लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आले.
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच प्रियांका भागित, उपसरपंच अमोल दाभाडे, संजय काटे, संगीता इंदोरे, कल्याणी इंदोरे, बी. टी. बांगर, प्रकाश इंदोरे, साहेबराव इंदोरे, लहू इंदोरे, दशरथ गांजाळे, माणिक गांजाळे, बन्सी गांजाळे, हेमंत गांजाळे, बाबाजी खानदेशे, रोशन वाबळे, संदीप जुन्नरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
चांडोली खुर्द-काटेमळा रस्त्याची दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. तेथील ग्रामस्थांनी भाजप किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय थोरात यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या सांगितली होती.
त्यानुसार 25 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. रस्त्याची कामे मार्गी लागल्याचे संजय थोरात यांनी सागितले. चांडोली खुर्द गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी 25 लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल भ थोरात यांचे आभार मानले.