धनकवडी – खडकवासल्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली आज वडगाव-धायरी परिसरात उमेदवार भीमराव तापकीर यांचा गाव भेट दौरा व पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा दुपारी २ वाजता संपन्न झाली. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
धायरी मुख्य रोडवरून सुरू झालेली ही पदयात्रा उंबऱ्या गणपती चौक, मुक्ताई गार्डन कमान, गणेशनगर मित्र मंडळ, रायकरनगर, गारमाळ, लाडली साडी सेंटर कॉर्नर, मिडीया कॉर्नर आणि शेवटी सुवासिनी मंगल कार्यालय (त्रिमूर्ती हॉस्पिटल) येथे झाली.
यावेळी या पदयात्रेत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, शिवसेना पुणे शहर प्रमुख पूजा रावेतकर, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेब नवले, राजश्री नवले, हरिदास चरवड, स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे,अतुल चकांकर चाकणकर,अनंता दांगट भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग नवले, प्रभाग अध्यक्ष: यशवंत लायगुडे. यासोबतच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.