ग्राम विकासासाठी गावात एकी हवी ; देशपांडे

रहिमतपूर – ग्राम विकासाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एकजुटीच्या दर्शनाने विकास होत असतो. विकासाची तळमळ प्रत्येक ग्रामस्थांमध्ये असावी, असे प्रतिपादन लीना देशपांडे यांनी केले. भारत फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएस आर फंडातून तारगाव तालुका कोरेगाव येथे बंदिस्त गटर बांधकामाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्थानी धामणेरचे सरपंच शहाजी क्षीरसागर हे होते.

देशपांडे म्हणाल्या, सामाजिक बांधिलकीतून कल्याणी उद्योग समूहाचे प्रमुख बाबासाहेब कल्याणी यांच्या विचारातून भारत फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गावच्या विकासाला चालना देण्यासाठी फंड वितरित करीत आहे. ज्या गावात विकास कामाविषयी ग्रामस्थांमध्ये जागरुकता असते अशा गावात विकास कामे देण्यात येत आहेत. रहिमतपूर परिसरातील धामणेर, बोरगाव, नागझरी, तारगाव अशा एकूण 19 गावात भारत फोर्जच्यावतीने अनेक विकास कामांचे आज लोकार्पण झाले आहे.

या गावांनी एकजुटीच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पूर्ण केले आहे. असाच आदर्श इतर गावांनीही घ्यावा. यावेळी भारत फोर्जचे जयदीप लाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतीलाल पाटील, पंचायत समिती सदस्य अण्णासो निकम, सरपंच सुलभा तावरे, उपसरपंच सुनिता निकम, माजी सरपंच सुनील मलवडकर, दिलीप देशमुख, लक्ष्मण निकम, सुरेश थोरात, अभिजित घोरपडे, प्रकाश घोरपडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक रत्नाकर शेटे (गुरुजी) सूत्रसंचालन संदीप मोरे व आभार दिलीप मोरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.