विलास कामठे यांनी दिली येवलेवाडी शाळेला रोपे

वानवडी – येवलेवाडी येथे कै. आशिष कामठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी शाळा नं. 2 येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी याच शाळेतील माजी विद्यार्थी येवलेवाडी गावचे उपसरपंच तथा उद्योजक विलास कामठे उपस्थित होते.

येवलेवाडी येथील शाळेला विलास कामठे यांच्याकडून 100 रोपे प्रदान केली. यावेळी त्यांना भाग्यश्री आभाने, मंजुषा शेंडकर, राजमाने, गायकवाड या सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले. तुळस वाटप या कार्यक्रमासाठी कै. आशिष कामठे युवा प्रतिष्ठान येवलेवाडी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यात अविनाश निंबाळकर, सौरभ येवले, अजहर सिद्धिकी, मोईन पानसरे, मयुर गरुड, प्रशांत कामठे, निखिल चव्हाण, शोएब पानसरे, अनस पानसरे, भाऊ कचरे, दीपक दहिफळे, नारायण कंधारे तरूण मंडळींचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूख्मिणी भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाऊ कचरे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)