भिलार गावातील वाचनसेवा तूर्त बंद

पाचगणी – पुस्तकांचं गाव भिलार येथे गावची यात्रा असल्याने रविवार दि. 2 ते मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुस्तकांच्या गावातील वाचनसेवा तात्पुरती बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली.

या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय यात्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (प्रकल्पातील पुस्तकदालने) वाचकांना, पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनसेवा आणि पर्यटनविषयक सेवा देऊ शकणार नाहीत.

मात्र, दि. 5 फेब्रुवारीपासून सर्व सेवा पूर्ववत सुरु होतील,अशी माहिती देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांनी व वाचकांनी सहकार्य करावे, अशी विनंती भिलार ग्रामपंचायत आणि प्रकल्प कार्यालयाने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.