Vikrant Massey | बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12 वी फेल’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील विक्रांतच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. यानंतर आता त्याच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगराही मुख्य भूमिकेत आहेत.
सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. अलिकडेच विक्रांतने खुलासा केला की, ‘मला सतत धमकी मिळत आहे. सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मला धमकीचे मेसेज मिळत आहेत. याविषयी कोणी काही विचारलं नाही, त्यामुळे मी आधी सांगितलं नाही. पण मला एक सांगायचं आहे की आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही गोष्ट सांगतो. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्ही अजून सिनेमा बघितलाच नाही त्याआधीच तुम्ही पूर्वग्रह मनात धरला आहे.”
द साबरमती रिपोर्टचं दिग्दर्शन रंजन चंडेलनं केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरनं केली आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 2002 साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट यावर्षी 3 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच विक्रांतचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ सिनेमा रिलीज झाला.