Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भारतीय अवकाश संशोधनाचे प्रणेते विक्रम साराभाई

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2019 | 12:59 pm
A A
भारतीय अवकाश संशोधनाचे प्रणेते विक्रम साराभाई

मुंबई – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) काही दिवसांपूर्वी चंद्राच्या दिशेने यान पाठवून भारतीय अवकाश संशोधनात एक मानाचे पान लिहिले असताना, या अंतराळ संशोधनाचे जनक असलेल्या डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांची जन्मशताब्दी आज देशभर साजरी केली जात आहे. भारतातले उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे असून त्याला डॉ. साराभाई यांचेच नाव देण्यात आलेले आहे.

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात 12 ऑगस्ट 1919 ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. विक्रम साराभाई यांच्या मातोश्री सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मोंटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले बारावीपर्यंतचे शिक्षण संपवून साराभाई पुढील शिक्षणासाठी वर्ष 1937 मध्ये ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले. त्यांनी बँगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रातील तज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्‍विक किरणावर संशोधन केले.

वर्ष 1944 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. तेथे त्यानी कॉस्मिक किरणांवर संशोधन करून डॉक्‍टरेट मिळवली आणि मग मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते. पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने वर्ष 1975 मध्ये जो पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना याच रिसर्च सेंटर मध्येच केली होती.

डॉ. विक्रम साराभाई यांना वर्ष 1966 मध्ये पद्मभूषण आणि वर्ष 1975 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. 30 डिसेंबर 1971 रोजी केरळमधील कोवालम येथे हृदयविकाराच्या झटक्‍याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या संस्था


अवकाश संशोधनासह विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक संस्थांची सुरवात केली.
1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था
2. भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठीची राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा
3. वस्त्रोद्योगातील आधुनिक अहमदाबाद टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन
4. पर्यावरण क्षेत्रातील सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग ऍन्ड टेक्‍नॉलॉजी

Tags: Birth anniversaryisroISRO scientistsnational newsvikram sarabhai

शिफारस केलेल्या बातम्या

#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा
latest-news

International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

1 week ago
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
टेक्नोलॉजी

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

2 weeks ago
मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !
Top News

मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !

2 weeks ago
जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Top News

जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

#Startupindia : राज्यांच्या स्टार्ट अप क्रमवारीची 4 जुलै रोजी होणार घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड मध्ये ; अनेक प्रकल्पांना देणार गती

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू हेल्मेटवर कॅमेरा लावून खेळणार; जाणून घ्या..काय आहे कारण?

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

Most Popular Today

Tags: Birth anniversaryisroISRO scientistsnational newsvikram sarabhai

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!