पुणे : क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हिंगणे येथील व्यायामशाळेत व्यायाम करताना कुस्तीपटू विक्रम पारखी याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. तो अवघ्या ३० वर्षांचा होता. त्याच्या अकाली निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
विक्रम बुधवारी (दि.12) नेहमी प्रमाणे व्यायामाला गेला. पण त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने बिर्ला रुग्णालयात नेले परंतु दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
कोण आहे विक्रम पारखी?
विक्रम पारखी हा मुळशी तालुक्यातील माने गावचा रहिवाशी आहे. तो एक प्रसिद्ध कुस्तीपटू होता. त्याला हिंदकेसरी अमोल बुचडे यांनी प्रशिक्षण दिले होते. विक्रमने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक मोठी पदके जिंकली होती. विक्रमने अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि रांची, झारखंड येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य पदकासह पदके जिंकली होती. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेतही तो सहभागी होणार होता. मात्र त्यागओदरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pushpa 2 : धक्कादायक ! पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू
काही दिवसांनी होणार होते लग्न
अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विक्रमचे लग्न 12 डिसेंबर रोजी होणार होते. परंतु त्या आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या पश्चात वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विक्रमच्या अश्या अचानक जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.