विक्रम लॅंडर नासाच्या ऑर्बिटर कक्षेत आल्याचे स्पष्ट

न्युयॉर्क – चांद्रयान-2 या भारताच्या ऐतिहासिक माहिमेत विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचा अंतिम टप्प्यातील प्रवास सुरु आहे. इस्रोचे अखेरच्या टप्प्यातील प्रयत्न सुरु असतानाच नासाच्या चंद्राभोवती फिरत असलेल्या ऑर्बिटरने चंद्रावरील विक्रम लॅंडरचा संपर्क तुटलेल्या क्षेत्रातील छायाचित्रे टिपल्याचे समोर येत आहे.

नासाच्या एका शास्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, नासाने आपल्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरच्या मदतीने 17 सप्टेंबर रोजी काही छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या शास्रज्ञांकडून सध्या या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. नासाने चंद्रावरील ज्या भागाची छायाचित्रे टिपली आहेत त्याच ठिकाणापासून विक्रम लॅंडरचा आणि इस्रो मुख्यालयाचा संपर्क तुटला होता.

उल्लेखनिय आहे की, विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याची वेळ मर्यादा ही 21 सप्टेंबरपर्यंतच आहे. नासाचे वैज्ञानिक जॉन केलर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून नासाने विक्रम लॅंडरचा संपर्क तुटला त्यावेळची छायाचित्र लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरने कैद केल्याचे स्पष्ट केले आहे.

“नासा’कडून छायाचित्रांचे विश्‍लेषण सुरू

नासाच्या ल्यूनार रिकनाईसन्स ऑर्बिटरने (एलआरओ) 17 सप्टेंबरला या भागावरून उडताना तेथील अनेक छायाचित्रे टिपली असून, ही संस्था आता या छायाचित्रांचे विश्‍लेषण करत आहे. विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या शक्‍यतेला 21 सप्टेंबपर्यंत मुदत आहे. त्यानंतर चंद्राच्या भागावर रात्र (ल्यूनार नाईट) सुरू होणार आहे.

नासाच्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली असल्याच्या वृत्ताला एलआरओचे प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी दुजोरा दिल्याचे सीनेट डॉट कॉमच्या वृत्तात म्हटले आहे. एलआरओसी चमू या नव्या छायाचित्रांचे विश्‍लेषण करेल आणि लॅण्डर दृष्टीस पडते की नाही (ते सावलीत असू शकते किंवा छायाचित्र घेतलेल्या भागाबाहेर असू शकते) हे पाहण्यासाठी त्यांची यापूर्वीच्या छायाचित्रांशी तुलना करेल, असे केली यांनी म्हटल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)