नवी दिल्ली – भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार विक्रम किर्लोस्कर यांनी स्वीकारला आहे. किर्लोस्कर सिस्टीम्स या कंपनीचे किर्लोस्कर हे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याचबरोबर टोयोटा किर्लोस्कर मोटर त्या कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत.
या अगोदर भारती इंटरप्राईजेसचे उपाध्यक्ष राकेश भारती मित्तल यांच्याकडे भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार होता. आगामी काळात महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष होणार आहेत. तर टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्रन उपाध्यक्ष होणार आहेत. गेल्या तीन दशकांपासून किर्लोस्कर भारतीय उद्योग महासंघाचे संबंधित आहेत.