मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचा प्रकृतीबाबत वृत्त माध्यमांना माहिती देताना पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की,’बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. त्यांचे विविध अवयवांनी काम करणे बंद केले आहे. अफवांना बळी पडू नका. डॉक्टर प्रयत्न करत आहे.’ अशी माहितीही वृषाली यांनी माध्यमांना दिली आहे. विक्रम गोखले हे ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.
दरम्यान, सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.