विक्रम भट्ट यांच्या ‘घोस्ट’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूडला अनेक भयपटांची ओळख करून देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी एका नव्या चित्रपटाची तयारी केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘घोस्ट’ असे आहे. १८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विक्रम भट्ट यांच्या आगामी ‘घोस्ट’ चित्रपटात कोण कलाकार झळकणार आहेत याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून हे गुढ पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.

आतापर्यंत विक्रम यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. असंख्य चित्रपटांचे त्यांनी लेखन केले आहे. सुमारे २५ वेब सिरीज त्यांच्या नावावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.