खा. विखेंना युथ आयकॉन पुरस्कार

नगर – सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केल्याबद्दल सी.एस.आर. नियतकालिक यांच्या वतीनं नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांना “युथ आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रिय अन्न व प्रक्रिया मंत्री हसमीरत कौर बादल यांच्या हस्ते डॉ.सुजय विखे यांचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सी.एस.आर. नियतकालिकाचे मुख्य संपादक अमित उपाध्यये उपस्थित होते. देशातील सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मानला जातो. डॉ.सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यातील 35 आरोग्य शिबीराच्या माध्यमातून 70 हजार पेक्षा जास्त रुग्णांची सुश्रुषा केल्याची दखल घेण्यात आली. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 208 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुबियांना दत्तक घेऊन त्यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणांची व्यवस्थाही खासदार विखे यांनी केली.

यावेळी खासदार विखे म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असून, ग्रामीण भागातील काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहित करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे. ग्रामीण भागात काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले असल्याचं, त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)