विखे सर्वाधिक तर काळे सर्वात कमी मतांनी विजयी

थोरात दुसर्‍या क्रमाकांवर,लंके,लहामटे, पवार ठरले जायंट किलर

नगर: जिल्ह्यातील बारा मतदारसंघाचे निकाल आज जाहीर होताना अनेकांचे बारा वाजले. कोपरगाव,श्रीगोंद्याच्या निकालाने काळजाचा ठोका चुकविला,तर पारनेर,कर्जत-जामखेड,अकोले,राहुरी,नगरशहर,श्रीरामपुर,नेवाशाचे निकालही चुरशीने लागले.शिर्डी,संगमनेरचा निकाल अपेक्षीत होता. पाथर्डी-शेवगावमध्ये कधी मागे कधी पुढे आणि मग भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळेच पुढेच राहिल्या. घड्याळाची टीकटीक वाढली, कमळ ङ्गुलेलच नाही,तर पंजाची धुकधुक कायम राहिली असे एकूण चित्र नगर जिल्ह्याच्या बारा लढतीचे राहिले!

राष्ट्रवादीने आठ जागा लढविताना पाच जागा जिंकल्या.भाजपाने नऊ जिंकून त्यांच्या पदरात अवघ्या तीन जागा पडल्या.चार जागा लढविणार्‍या शिवसेनेला भोपळाही ङ्ग ोडता आला नाही. इंदिरा काँग्रेसची धुकधुक कायम राहिली. त्यांनी तीन जागा लढवून त्यातील दोन जागा जिंकल्या.या सार्‍या लढतींचे निकाल बघता अपेक्षेप्रमाणे शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे सर्वाधिक 87024 मतांनी विजयी झाले. तर,कोपरगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे सर्वाधिक कमी 822 मतांनी विजयी झाले.त्यापाठोपाठ संगमनेरमधून इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 62 हजार 252 च्या मताधिक्याने विजयी झाले.

त्यानंतर तिसर्‍या क्रमांकाने पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना अस्मान दाखविणार्‍या निलेश लंके यांनी औटी यांचा 59838 मतांनी पराभव केला. तर त्यापाठोपाठ अकोल्यात राष्ट्रवादीचे किरण लहामटे यांनी भाजपाच्या वैभव पिचडांना 57689 मतांनी अस्मान दाखवले.राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेडच्या लढतीत पालकमंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी 43347 मतांनी चितपट केले. त्यापाठोपाठ नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना 30663 मतांनी मात दिली. राहुरीत प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाच्या आमदार शिवाजी कर्डिले यांना 23326 मतांनी स्पर्धेतून बाहेर टाकले.

श्रीरामपूरमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लहू कानडे यांनी 16994 मतांनी पराभूत केले. शेवगाव-पाथर्डीत सुरवातीला चुरस जाणवली पण अंतिम टप्प्यात भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना 14294 मतांनी मात दिली.नगर शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप दुसर्‍यांदा आमदार झाले. त्यांनी सेनेचे अनिल राठोड यांना 11139 मतांनी नमवले.मागील वेळेपेक्षा ही आघाडी वाढली आहे. श्रीगोंद्यात सुरुवातीला भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना वनसाईड वाटणारी लढत राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी शेवटच्या टप्प्यात अतिशय रंगतदार बनवली.पाचपुते अवघ्या 4750 मतांनी विजयी झाले. तर सर्वात चुरशीची लढत कोपरगावमध्ये झाली.राष्ट्रवादीचे आशुतोष काळे भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना शेवटी भारी पडले. अवघ्या 822 मतांनी त्यांनी कोल्हे यंाना नमवले.

मतदारसंघ विजयी उमेदवार मताधिक्य

 • शिर्डी:राधाकृष्ण विखे भाजप 87024
 • संगमनेर:बाळासाहेब थोरात काँग्रेस 62252
 • पारनेर:निलेश लंके राष्ट्रवादी 59838
 • अकोले:किरण लहामटे राष्ट्रवादी 57689
 • कर्जत-जामखेड:रोहीत पवार राष्ट्रवादी 43347
 • नेवासा:शंकरराव गडाख राष्ट्रवादी काँगे्रस पुरस्कृत अपक्ष 30663
 • राहुरी:प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी 23336
 • श्रीरामपूर:लहू कानडे काँग्रेस 16994
 • पाथर्डी-शेवगावःमोनिका राजळे:भाजपा 14294
 • नगर शहर:संग्राम जगताप राष्ट्रवादी 11139
 • श्रीगोंदा: बबनराव पाचपुते भाजपा 4750
 • कोपरगाव: आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस 822

Leave A Reply

Your email address will not be published.