गुरुवारी 52 उमेदवारांचे अर्ज दाखल
मतदार संघात आज एकुण 6 लोकांनी 10 अर्ज नेले.
नगर – विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी गुरूवारी विविध मतदारसंघातुन 52 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी दि.3 शेवटचा दिवस आहे.
आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने वैभव पिचड,किरण लहामटे (अकोले,राधाकृष्ण विखे (शिर्डी),स्नेहलता कोल्हे,राजेश परजणे (कोपरगाव), डॉ.चेतन सदाशिव लोखंडे (श्रीरामपूर),बाळासाहेब मुरकुटे,शंकरराव गडाख (नेवासा),मोनिका राजळे,हर्षदा काकडे,अमोल गर्जे (पाथर्डी-शेवगाव),शिवाजी कर्डिले,रावसाहेब तनपुरे (राहुरी),विजय औटी,संदेश कार्ले,सुजीत झावरे (पारनेर),अनिल राठोड,संग्राम जगताप (नगर शहर),बबनराव पाचपुते,प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा),रोंहित पवार (कर्जत-जामखेड )यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आठ आमदारांनी आज अर्ज दाखल केले.
अकोले मतदारसंघातून वैभव पिचड यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शोभा संजय फड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्यावतीने त्यांच्या प्रस्तावकांनी दोन तर अल्ताफ इब्राहिम शेख यांनी अपक्ष म्हणून एक असे एकुण तीन अर्ज दाखल करण्यात आले.
कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता बिपीन कोल्हे (भारतीय जनता पार्टीं), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), अशोक विजय गायकवाड (बहुजन वंचित आघाडी), खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई आणि दिक्षित बाळकृष्ण तुकाराम यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले.
श्रीरामपूर मतदारसंघात अशोक राजाराम जगधने (अपक्ष), भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. चेतन सदाशिव लोखंडे (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक असे अर्ज दाखल केले.
नेवासा मतदारसंघात मच्छिंद्र देवराम मुंगशे- अपक्ष 01 अर्ज, बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे-भाजपा- 02 अर्ज, भाऊसाहेब शिवराम जगदाळे-अपक्ष 01 अर्ज, शंकरराव यशवंतराव गडाख – क्रांतीकारी शेतकरी पार्टी 02 अर्ज, विठ्ठल विष्णु देशमुख- अपक्ष 01 अर्ज सादर केला.
शेवगाव मतदारसंघातून मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष आणि भाजप), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), अमोल गर्जे (अपक्ष आणि भाजप), विठठल वाघ (अपक्ष), संदीप शेलार (अपक्ष), धीरज बताडे (राईट टु रिकॉल), ज्ञानेश्वर जाधव (जय महाभारत), संजय लहासे (अपक्ष), सुभाष साबळे (बहुजन समाज पार्टी) आणि नीलेश ढाकणे (अपक्ष) आदींनी अर्ज दाखल केले.
राहुरी मतदारसंघातुन शिवाजी भानुदास कडिर्ले यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन अर्ज तर रावसाहेब राधुजी तनपुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पारनेर मतदारसंघात औटी विजयराव भास्करराव (शिवसेना-4), संदेश तुकाराम कार्ले (अपक्ष-2), पाटील सुजित वसंतराव (अपक्ष), यांनी अर्ज सादर केले.
नगर शहर मतदारसंघात आज अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरूण जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) तर संदिप लक्ष्मण सकट आणि संजय एकनाथ कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव भिकाजी पाचपुते (3), पाचपुते प्रतिभा बबनराव (1), सुनील शिवाजी उदमले (1), सुनील लक्ष्मण ओहोळ (1) यांनी अर्ज दाखल केला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित राजेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीच्या वतीने तीन आणि अपक्ष असे चार अर्ज, गोविंद लक्ष्मण आंबेडकर (अपक्ष), उत्तम फकिरा भोसले (हिंदुस्थान जनता पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), किसन नामदेव सदाफुले (अपक्ष), शंकर मधुकर भैलुमे (बहुजन समाज पार्टी) आणि रावसाहेब मारुती खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
दरम्यान, अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात गुरूवारी 6 जणांनी 9 अर्ज नेले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 12 जणांनी 24 नामनिर्देशनपत्रे नेली. शिर्डी मतदारसंघात 7 जणांनी 27 अर्ज नेले. कोपरगाव मतदारसंघात 7 उमेदवारांनी 9 अर्ज नेले. श्रीरामपूर मतदारसंघात 12 जणांनी 23 नामनिर्देशनपत्रे नेली.
नेवासा मतदारसंघात 7 व्यक्तींनी 7 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. शेवगाव मतदारसंघात 12 जणांनी 15 अर्ज नेले. राहुरी मतदारसंघात 10 जणांनी 12 अर्ज नेले. पारनेर मतदारसंघात 4 व्यक्तींनी 7 अर्ज नेले. अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात एकुण 14 लोकांनी 23 अर्ज नेले. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आज एकुण 18 लोकांनी 21 अर्ज नेले.