अमान (जाॅर्डन) – भारताचा मुष्टियोध्दा विकास कृष्ण याने शुक्रवारी 69 किलो वजनी गटात आशियाई आॅलिम्पिक पात्रता मुष्टियुध्द स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
#TOPSAthlete @officialvkyadav recorded a comfortable 5-0 win over Kyrgystan’s Nursultan Mamataly in men’s 69 kg to reach the quarterfinals of the Asia-Oceania Olympic boxing qualifier. He is one win away from reaching his 3rd Olympics.@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice pic.twitter.com/zyZEw2fU7q
— SAIMedia (@Media_SAI) March 7, 2020
विकास याने कर्गिस्तानच्या नूरू सुल्तान ममातोली यांचा 5-0 असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आता विकासचा सामना जपानच्या सेवेनोरेत्स ओकाजावाशी होणार आहे. या लढतीत जर विकासने विजय मिळविला तर तो टोकियो आॅलिम्पिकला पात्र ठरणार आहे.