इंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केला सत्कार 

रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते विजय वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वाघमोडे यांची निवड करण्यात आली. वाघमोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते आहेत. विविध सामजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. वाघमोडे यांच्याकडे तरुणांचा मोठा फौजफाटा आहे.  तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असल्याने तरुणांनी संपूर्ण शहर शुभेच्छांच्या बॅनरने रंगवून टाकले आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, ऍड. राहुल मखरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, वसंतराव माळुंजकर , मनोज पवार व शेकडो कार्यकर्त्यांनी व युवकांनी वाघमोडे यांना शुभेच्छा दिल्या.

” जिल्हाध्यक्ष यांनी सार्थ निवड केली ” 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी नेहमीच योग्य पदासाठी योग्य उमेदवार निवडला आहे. इंदापूर शहरात शेकडो तरुणांचे चांगले संघटन नूतन स्वीकृत नगरसेवक विजय वाघमोडे यांनी बांधले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मजबूत जाळे निर्माण करण्यासाठी पक्षाला चांगला फायदा होणार आहे. जिल्हा अध्यक्ष यांनी सार्थ निवड केली असल्याचे समाधान आहे असे मत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.