म्हणून गडकरींनी कानामध्ये गपचूप सांगितलं की, फडणवीसांची जिरवायची होती, गडकरी-फडणवीसांचा ३६ चा आकडा

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं. असा खळबळजनक दावा आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते नांदेड मध्ये बिलोली येथील प्रचारसभेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपुरवाल्यांना माहिती आहे. तिकडे भाजपामध्ये दोन टोके आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस आहेत. तर दुसरीकडे नितीन गडकरी आहेत. दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गपचूप सांगितलं की, फडणवीसांची जिरवायची होती. तशी ती जिरली. आता पुन्हा जिवरायचीय. पण कुणाची जिरेल ते कळेल. मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार मात्र बदलणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.