Vijay Shivtare : पुरंदरचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांना त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि डॉ. ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या काही काळापासून विजय शिवतारे गंभीर किडनी आजाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचे कार्य निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावा लागत होता. प्रकृती खालावत असताना मुलगी ममता यांनी पुढाकार घेत वडिलांना नवजीवन देण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. वडिलांसाठी मुलीने केलेल्या या त्यागाची सर्वत्र चर्चा होत आहे. vijay shivtare ममता यांचे पती माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आहेत. पत्नीने घेतलेल्या या निर्णयानंतर शिवदीप लांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी ममता यांच्या बद्दल अभिमान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. शिवदीप लांडे यांची पोस्ट Vijay Shivtare गौरी, आयुष्यात अनेक अडचणी आल्या, संकटांनी वेढलं, प्रतिकूल परिस्थितीही अनेकदा समोर उभी राहिली; पण मी कधीच डगमगलो नाही. मात्र तुझ्या एका निर्णयाने… फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं. आपल्या वडिलांना नवजीवन देण्यासाठी तू स्वतःची किडनी दान करण्याचा घेतलेला निर्णय… तुझं वडिलांप्रती असलेलं निःस्वार्थ प्रेम, त्याग आणि जिद्द पाहून मी नतमस्तक झालो आहे. खरोखर नतमस्तक. गेल्या तीन महिन्यांत शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या असंख्य वैद्यकीय तपासण्या, कागदपत्रांची मोठी प्रक्रिया, कायदेशीर अडथळे – हे सगळं तू एकटीने सांभाळलंस. आणि मी? फक्त एक मूक साक्षीदार म्हणून तुला पाहत राहिलो. तेव्हा एक प्रश्न मनात आला – देव माणसाच्या आयुष्यात मुलगी का देतो? आज त्याचं उत्तर मिळालं. आईचं अस्तित्व आयुष्यात एका टप्प्यापर्यंत असतं, पण तिची उणीव देव मुलीच्या रूपात आयुष्यभर भरून काढतो. आज मुंबईतील आयसीयूमध्ये, किडनी प्रत्यारोपणानंतर तुझ्या शेजारी बसून तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना डोळ्यातून अश्रू थांबतच नाहीत. का थांबत नाहीत हे अश्रू? आज समजलं… नात्यांमध्ये भाऊ साथ सोडू शकतो, मुलगा दूर जाऊ शकतो, बहीण वळू शकते, अगदी पत्नीही आयुष्य-मृत्यूच्या या संघर्षात मागे हटू शकते. पण मुलगी? ती निःस्वार्थपणे ठाम उभी राहते… स्वतःचं आयुष्य धोक्यात घालूनही. तुझे डोळे मिटलेले आहेत, गौरी… पण तुझं प्रेम, तुझा त्याग प्रत्येक वडिलांना शिकवून जातो की मुलगी ही देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. Vijay Shivtare विजय शिवतारे ‘बापू’ या नावाने प्रसिद्ध विजय शिवतारे हे ‘बापू’ या नावाने प्रसिद्ध असून ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी सलग दोनदा विजय मिळवला होता. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतरही २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. Vijay Shivtare हेही वाचा: Ashok Kharat Case : खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर; शिंदे, पाटील, शेलार, चाकणकरांचा प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख