#ICCWorldCup2019 : विजय शंकरची दुखापत गंभीर नाही

लंडन  – 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला सरावादरम्यान झालेली दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले असुन शुक्रवारी सरावा दरम्यान खलिल अहमदचा चेंडू विजय शंकरच्या हातावर आदळला. यानंतर टीम इंडियाच्या फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फराहत व वैद्यकीय टीमने विजय शंकरला झालेल्या दुखापतीचे स्कॅनिंग केले यात दुखापत जास्त गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

यावेळी न्युझीलंड विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या आदल्या दिवशी सराव शिबिराच्या वेळी विजय शंकरच्या हाताला चेंडू लागला, त्यामुळे भारतीय संघासमोर चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर शनिवारी आलेल्या अहवालात विजय शंकरला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय शंकरला संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यातही विजय शंकर खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी विजय शंकर दुखापतीमधून सावरतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.