#CWC19 : दुखापतीमुळे आणखी एक भारतीय खेळाडू विश्वचषकातून बाहेर

लंडन – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला दुखापतीमुळे विश्वचषक2019 स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. त्याच्याऐवजी आता मयंक अग्रवाल यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मयंक हा कर्नाटक संघातून खेळतो, तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद देखील संभाळले आहे.

 

विजय शंकर याला सरावादरम्यान पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. दरम्यान, ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आलं होतं त्यामुळं तो लवकरच पुनरागमन करेल अशी आशा होती. त्यानंतर रविवारी झालेल्या इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात मात्र वगळण्यात आलं होतं. पण आता स्पष्ट झालं आहे की दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतील या अष्टपैलू खेळाडूचा प्रवास संपला आहे.

दरम्यान, याआधी भारतीय फलंदाज शिखर धवनला देखील दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघारी फिरावे लागले होते. तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा देखील दुखापतीमुळं संघाच्या बाहेर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.