मल्ल्याच्या कर्जवसुलीसाठी जंगम मालमत्तेच्या वापरास मान्यता

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या जंगम मालमत्तेचा वापर करण्यास विशेष न्यायलयाने परवानगी दिली. त्यामुळे स्टेट बॅंकेसह 15 बॅंकांना त्यांच्या ताब्यातील जंगम मालमत्ता वापरता येणार आहेत.

मल्ल्याला फरार घोषीत करून युनायटेड ब्रेव्हरेजचे भाग भांडवलासह त्याच्या वित्तिय ठेवी मनी लॉंडरींग ऍक्‍टनुसार 2016 मध्ये जप्त करण्यात आल्या होत्या.त्याला फरार घोषित केल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार त्याची मालमत्ता जप्त करता येते.

मल्ल्याला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या जंगम मालमत्तेचा विनियोग करता यावा अशी मागणी या बॅंकानी विशेष न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार ज्येष्ठ वकील राजीव पाटील यांनी बॅंकाची बाजू मांडली. त्यानुसार त्याच्या जंगम मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली.

या निर्णयाला मुंबई उच्च न्यायलयात आव्हान देण्यासाठी 18 जानेवारूपर्यंत मुदत देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार मल्ल्या यांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली आहे. मात्र ही मालमत्ता एसबीआयच्या ताब्यात द्यायची की त्याचा अधिकार द्यायचा याबाबत स्पष्टता नसल्याने आम्ही न्यायलयाच्या आदेशाची वाट पहात आहोत असे मल्ल्याचे वकील अमित देसाई यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.