प्रत्यार्पणाविरोधात विजय मल्ल्याचे अपील

लंडन : विजय मल्ल्याने यांनी प्रत्यार्पणाविरोधात लंडन हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारपासून याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या फरार आहेत. लंडन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने डिसेंबर 2018 साली विजय मल्ल्या यांना भारताच्या ताब्यात द्यावे असा आदेश ब्रिटन सरकारला दिला होता. मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या निकालाविरोधात विजय मल्ल्या यांनी कोर्टात अपील केले आहे.

विजय मल्ल्या यांनी कोणाचीही फसवणूक केली नाही. त्यांनी किंगफिशर एअरलाइन्स कंपनीसाठी कर्ज मागितले होते. त्यांच्या विमान कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. विजय मल्ल्या प्रतिष्ठित व्यक्ती असून ते एका रात्रीत पाळणारे व्यक्ती नाही, असा दावा त्यांच्या वकिलाने मंगळवारी न्यायालयात केला. मंगळवारी सुनावणीसाठी मल्ल्या न्यायालयात आले होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे विजय मल्ल्या यांनी टाळले. बँकांकडून घेतलेल्या 9 हजार कोटींच्या कर्ज प्रकरणात विजय मल्ल्या 2016 पासून फरार आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.