माझ्यासोबत अन्याय झालाय – विजय मल्ल्या

नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांच्या कर्जबुडवेगिरी आणि आर्थिक अफरातफरप्रकरणी वादाच्या भोवऱ्यातील विजय मल्ल्याने आपली 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केला आहे. विजय मल्ल्याने भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयने “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केल्यानंतर मल्ल्याला भारतात आणण्याचाही मार्ग मोकळा झाला. पण 9 हजार कोटींच कर्ज असताना आपल्याकडून 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा विजय मल्ल्याने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दररोज सकाळी उठतो तेव्हा एक नवी संपत्ती जप्त केल्याचं मला कळतं. बँकांच्या कर्जाची व्याजासह रक्कम अगोदरच वसूल झाली आहे. पण अजून हे किती दिवस चालणार आहे आणि त्यापुढे काय असेल असा सवाल मल्याने केला आहे. त्याने याबाबत ट्विटरवर ट्टविट करत हा दावा केलाय. तसेच माझ्यासोबत अन्याय झाला, असल्याचं देखील मल्याने म्हटलं आहे.

माझ्याकडून एवढी संपत्ती जप्त करूनही बँकांनी माझ्याविरोधात लढण्यासाठी इंग्लंडमध्ये वकील दिले आहेत. त्या वकिलांकडून माझ्यावर नको ते आरोप केले जात आहेत. या कायदेशीर प्रक्रियेमुळे लोकांचा पैसा खर्च केला जातोय, याला जबाबदार कोण ? असा सवाल मल्याने सरकारला केला आहे.

एवढी संपत्ती तर जप्त केली आहेच, पण भारतातलं कर्ज चुकवण्यासाठी माझ्याकडे ब्रिटनमध्येही पैसे मागितले जात आहेत. हे सर्वात मोठं दुर्दैवं आहे, असंही विजय मल्ल्याने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)