पुणे – ए बी विजयकुमार यांची बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी विजयकुमार हे इंडियन ओव्हरसीज बॅंक येथे मुख्य सतर्कता अधिकारी म्हणून कार्यरत होते.
इंडियन ओव्हरसीज बॅंकेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी पूर्वीच्या कॉर्पोरेशन बॅंकेत मुख्य सतर्कता अधिकारी म्हणून व त्यापूर्वी मध्य प्रदेश ग्रामीण बॅंकेचे अध्यक्षपदी कार्यरत होते. विजयकुमार यांनी बॅंकिंग मधील कारकीर्द सन 1984 मध्ये बॅंक ऑफ इंडियामधून सुरु केली.
प्रत्यक्ष क्षेत्र स्तरावर व प्रशासकीय कार्यालयात बॅंकेच्या कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालयासह महत्वाचे विभाग हाताळत ते सन 2018 मध्ये सरव्यवस्थापक झाले. त्यांनी देशात अनेक ठिकाणी काम केले असून हॉंगकॉंग केंद्राचे अनुपालन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
त्यांनी मोठ्या निगमिय कंपन्या विभाग, रिटेल बॅंकिंग विभाग, प्राथमिकता क्षेत्र, विदेशी चलन विनिमय विभाग, अनुपालन, संचालक मंडळ सचिवालय, मानव संसाधन व सतर्कता यंत्रणेत काम केले आहे.