आष्टापूर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजय कोतवाल यांची निवड

वाघोली : आष्टापूर  (ता.हवेली) महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी विजय कोतवाल यांची निवड तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोतवाल यांची निवड करण्यात आली. आष्टापूर ग्रामपंचायतच्या वतीने ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात आली.

यामध्ये सदरची तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच कविता योगेश जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, उपसरपंच विकास कोतवाल, ग्रामसेविका जोशना बगाटे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.